Ad will apear here
Next
शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
शिर्डी : येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, यांच्या वतीने २६ जुलैपासून सुरू असलेल्‍या गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता हभप चारुदत्‍त आफळे यांच्‍या काल्याच्या कीर्तनाने झाली.

३० जुलै रोजी उत्‍सवाच्‍या सांगता दिनी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल व प्रखर अग्रवाल यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली. उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम व त्‍यांची सुविद्य पत्‍नी मनाली निकम यांनी गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा केली. सकाळी १०.३० वाजता काल्याच्‍या कीर्तनानंतर दहिहंडी फोडण्‍यात आली.

या वेळी संस्‍थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायंकाळी धुपारतीनंतर ७.३० ते नऊ यावेळेत शिर्डी येथील सुधांशु लोकेगांवकर यांचा, नऊ ते ९.४५ रायपूर येथील अंचल शर्मा यांचा, तर ९.४५ ते अकरा या वेळेत रायपूर येथील मदन चौहान यांचा साई भजनाचा कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपात झाला. या कार्यक्रमांना श्रोत्‍यांनी उत्‍स्‍फूर्त दाद दिली.

हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी अग्रवाल व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, पोलिस उपअधिक्षक आनंद भोईटे, सर्वप्रशासकीय अधिकारी, सर्व विभागप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZZFBR
Similar Posts
‘श्री साईबाबा संस्‍थान’तर्फे शिर्डी महोत्सवाचे आयोजन शिर्डी : ‘श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था यांच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागत यानिमित्त शिर्डी महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे. श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेऊन समाधी मंदिर ३१ डिसेंबर २०१८ रोजी दर्शनासाठी रात्रभर
साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये सहा कोटींचे सिटी स्‍कॅन मशीन शिर्डी : येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थेच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये सुमारे ६.५३ कोटी रुपये किंमतीच्‍या नवीन अत्‍याधुनिक १२८ स्लाइस सिटी स्‍कॅन मशीनचे उद्घाटन संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
‘शिर्डीचे समाधी मंदिर १८ ऑक्‍टोबरला रात्रभर खुले’ शिर्डी : ‘श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था यांच्या वतीने १७ ते १९ ऑक्‍टोबर २०१८ या काळात शंभरावा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा करण्‍यात येणार आहे. या काळात साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेऊन १८ ऑक्‍टोबरला समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे,’ अशी माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले
नरवीर तानाजी तरुण मंडळातर्फे भव्य देखावा पुणे : नरवीर तानाजी वाडी येथील नरवीर तानाजी तरुण मंडळातर्फे शिर्डी येथील साईबाबा यांच्या मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा २५०० फूट जागेत साकारण्यात आला होता. दिव्य स्वरूपात उभारलेल्या या देखाव्यातून भाविकांना प्रत्यक्ष साईबाबांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language